श्री समर्थ रामदास कृत
आत्माराम
II श्रीराम समर्थ II
आत्माराम
समास पहिला - त्यागनिरूपण
जयास लटिका आळ आला .
जो मायागौरीपासून जाला .
जालाचि नाहीं तया अरूपाला .
रूप कैंचें ?.......................(१-१)
तेथें स्तवनाचा विचार .
न घडे निर्विकारीं विकार .
परी तयास नमस्कार .
भावबळें माझा ..........................(१-२)
जयाचेनि वेदशास्त्रपुराणें .
जयाचेनि नाना निरूपणें .
जयाचेनि स्वसुखा लाधणें .
शब्दीं निःशब्द .....................(१-३)
जें शब्दास आकळेंना .
जें शब्देवीण सहसा कळेंना .
कळले ऐसेंहि घडेना .
जियें स्वरूपी ..............................(१-४)
ऐसें सदा सर्वत्र संचलें .
जे तर्का न वचे अनुमानलें .
तें जयेचेनि प्राप्त जालें .
आपरूप आपणासी ....................(१-५)
नमन तिचिया निजपदां .
माया वाग्देवी शारदा .
जयेचेनि प्रवर्तती संवादा .
संत महानुभाव .....................(१-६)
आतां वंदीन सद्गुरुस्वामी .
जेथें "राहिलें" तोचि मी .
आणि निवारिलीं निजधामीं .
पांचहि जेणें ......................(१-७)
तया निजपदाकडे .
आनंदें वृत्ति वावडे .
पद लाधलियां जडे .
तद्रूप होउनी ................................(१-८)
स्वामीकृपेचा लोट आला .
मज सरोवरी सामावला .
पूर्ण जालियां उचंबळला .
अनुभव उद्गार .........................(१-९)
माझें सद्गुरुकृपेचें बळ .
मजमाजी सांठवलें तुंबळ .
तेणें बळें स्वानंदजळ .
हेलाऊं लागे .............................(१-१०)
आता नमस्कारीन राम .
जो योगियांचें निजधाम .
विश्रांती पावे विश्राम .
जये ठायीं .................................(१-११)
जो नावारूपावेगळा .
जो ये मायेहून निराळा .
जेथें जाणिवेची कळा .
सर्वथा न चले ..........................(१-१२)
जेथें भांबावला तर्क .
जेथें पांगुळला विवेक .
तेथें शब्दांचें कौतुक .
केंवी घडें ?................................(१-१३)
जयालागी योगी उदास .
वनवासी फिरती तापस .
नाना साधनीं सायास .
जयाकारणें करिती ..................(१-१४)
ऐसा सर्वात्मा श्रीराम .
सगुण निर्गुण पूर्णकाम .
उपमाच नहीं निरोपम .
रूप जयाचें .............................(१-१५)
आतां वंदीन संत सज्जन श्रोते .
जे कृपाळू भावाचे भोक्ते .
माझीं वचनें पराकृतें .
सांगेन तयापासीं ......................(१-१६)
तयांचें वर्णावे स्वरूप .
तरी ते स्वरूपाचे बाप .
जे वेदांसि सांगवेना रूप .
तें जयाचेनि प्रगटें ...............(१-१७)
आतां शिष्या सावधान .
ऐक सांगतों गुह्यज्ञान .
जेणें तुझे समाधान .
आंगीं बाणे ..............................(१-१८)
तुवां आशंका नाहीं घेतली .
परंतु मज तुझी चिंता लागली .
कां जें तुझी भ्रान्ति फिटली .
नाहींच अद्यापि ................(१-१९)
दासबोधीचे समासी .
निर्मूळ केलें मीपणासी .
तया निरूपणेंहि वृत्तीसी .
पालट दिसेना .....................(१-२०)
म्हणोनि न पुसतां सांगणें .
घडलें शिष्या तुजकारणें .
आतां तरी सोये धरणें .
श्रवणमननाची .....................(१-२१)
चातकपक्षी वरीचावरी .
चंचु पसरून थेंबुटाधरी .
जीवन सकळहि अव्हेरी .
भूमंडळींचें .......................(१-२२)
तैसा शब्दवरूषाव होता .
असों नेदवीं वेग्रता .
श्रवणपुटीं सामावितां .
मनन करावें ..........................(१-२३)
लागवेग जाणोन शब्दाचा .
आवांका पाहावा मनाचा .
शब्दाआंतील गर्भाचा .
सांटावा घ्यावा ........................(१-२४)
अरे तू कोण कोणाचा .
कोठून आलासी कैंचा .
ऐसा विचार पूर्वीचा .
घेई बापा ...............................(१-२५)
अरे तां जन्मांतर घेतलें .
काय मानितोसि आपुलें .
ऐसें तुवां विचारिलें .
पाहिजे आतां ..........................(१-२६)
येथें तुझें काहींच नाहीं .
भुलला आहेस काई .
चुकोन आलासी, जाई .
जेथीचा तेंथें..........................(१-२७)
तू समर्थाचें लेकरूं .
अभिमानानें घेतला संसारु .
अभिमान टाकितां पैलपारु .
पावशील बापा ...............(१-२८)
ईश्वरापासून जालासी .
परी तूं तयासी चुकलासी .
म्हणोनी हे दु:ख भोगिसी .
वेगळेपणें उत्कट .............(१-२९)
त्यागिसी सकळ वैभवाला .
आणि विश्वाससी माझिया बोला .
तरी मी घालीन रे तुजला .
जेथील तेथें ...................(१-३०)
तुझे अढळपद गेलें .
तुज मायेनें वेढां लाविलें .
तें जरी तुझें तुज दिधलें .
तरी मज काय देसी ..........(१-३१)
जितुकें काहीं नासोन जाईल .
जें अशाश्वत असेल .
तुजसमागमें न येईल .
तितुके द्यावे मज .................(१-३२)
मजहिं तें कायें करावें .
परी तुजपासून टाकवावें .
तुंवां टाकिलें तरी न्यावें .
तुज समागमे ...................(१-३३)
अरे भूषण भिक्षेचें सांडिलें .
आणि राजपद प्राप्त जालें .
तरी तुझे काये गेलें .
सांग बापा .........................(१-३४)
नाशिवंत तितुकेंचि देसी .
तरी पद प्राप्त निश्चयेंसी .
त्यामध्ये लालुच करिसी .
तरी स्वहित न घडे ..........(१-३५)
तों शिष्य म्हणे जी दिधलें .
स्वामी म्हणती पद लाधलें .
आतां तूं आपुलें .
काहीं मानू नको .........................(१-३६)
इतुके स्वामी बोलिलें .
आज्ञा घेऊन निघालें .
तंव शिष्ये विनविलें .
विनीत होउनी ......................(१-३७)
आतां पुढिलियें समासी .
संवाद होईल उभयतांसी .
तेणें स्वानंद सिंधुसि .
भरितें दाटे बळें ..................(१-३८)
इतिश्री आत्माराम .
रामदासी पूर्णकाम .
ऐका सावध, वर्म .
सांगिजेल ..........................(१-३९)
समास पहिला संपूर्ण
II जय जय रघुवीर समर्थ II
II श्रीराम समर्थ II
आत्माराम
समास दुसरा - मायानिरूपण
जय जय जी सच्चिदानंदा .
जय जयजी आनंदकंदा .
जय जय जी निजबोधा .
परमपुरुषा .......................(२-१)
अनंत ब्रह्मांडाऐंसी ढिसाळें .
मायेनें रचिलीं विशाळें .
तें तुमचे कृपेचेनि बळें .
विरतीं स्वानंदडोहीं...............(२-२)
आतां स्वामीनें जें काहीं इच्छिलें .
तें पाहिजें अंगीकारिलें .
शरणागत आपुलें .
समर्थें उपेक्षूं नयें ................(२-३)
नाशिवंत काये म्या टाकावें .
तें मज स्वामीनें सांगावें .
मज दातारें करावें .
आपणा ऐसें ......................(२-४)
ऐकोन शिष्याचें बोलणें.
स्वामी म्हणती सावध होणें .
अवधान देऊन घेणें .
आनंदपद ..........................(२-५)
शिष्या बहू मन घाली .
आतां बाष्कळता राहिली .
येथें वृत्ति चंचल केली .
तरी बुडसी संदेहसागरी ..........(२-६)
अग्निसंगे लोहो पिटे .
तेणें तयाचा मळ तुटे .
मग परिसेसीं झगटता पालटे .
लोखंडणा तयाचें ....................(२-७)
तयाचा मळ झडेना .
आणि अभ्यांतर कळेना .
तरी तें सहसा पालटेंना .
मृत्तिकारूपें .......................(२-८)
म्हणउन नाशिवंत तितुका मळ .
तुंवां तजावा अमंगळ .
तो गेलिया तूंच "केवळ" .
आहेस बापा ......................(२-९)
तरी नाशिवंत तें तू जाण माया .
माईक जाये विलया .
ते मायेचा विचार प्राणसखया .
ऐक सांगतों .....................(२-१०)
"अहं" ऐसें जें स्फुरण .
तेंचि मायेंचें लक्षण .
तये मायेपसून त्रिगुण .
गुणापासून भूतें .................(२-११)
पृथ्वी आप तेज वायो आकाश .
सृष्टि रचिली सावकास .
येथें दृश्य आणि अदृश्य .
सकळ माया ...................(२-१२)
येक माया दों ठायीं वाटलीं .
प्रकुर्ती आणि पुरुष जालीं .
जैसीं दों दिसांची बोली .
येकचि परवा ....................(२-१३)
माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान .
माया ध्याता ध्येय ध्यान .
माया हेंचि समाधान .
योगियांचें ............................(२-१४)
माया सच्चिदानंद .
माया आनंदाचा कंद .
माया हेचि निजबोध .
शब्दरूपें ..............................(२-१५)
आत्मा ब्रह्म आणि स्वरूप .
हेंहि मायेचेंचि रूप .
रूप आणि अरूप सकळ माया ...(२-१६)
जीव आणि ईश्वर .
हाहि मायेचाचि विस्तार .
विश्वरूप विश्वंभर .
अवघी माया ..........................(२-१७)
माया मनास चाळक .
माया बुधीस व्यापक .
माया येकीं अनेक .
ऐसें बोलणें ...........................(२-१८)
मायेनेंचि माया चाले .
मायेनेंचि माया बोले .
मायेनेंचि माया हाले .
वायोरूपें ...............................(२-२०)
(*see Note1)
तों शिष्य म्हणे जी ताता .
माया चाले स्वरूपसत्ता .
अरे ! सत्ता तेचि तत्त्वतां .
माय जाण ......................(२-२१)
तरी मायेनें स्वइच्छ्या असावें .
आणि स्वरूपसत्तेंने नसावें.
मनास आलें तैसें करावें .
हें केंवी घडे ?....................(२-२२)
खर्यावरी लटिकें चौताळलें .
लटिकें मर्यादानें राहिलें .
ते तुंवां गर्भाधानें देखिलें .
हे अघटित वार्ता ...............(२-२३)
तैसी माया हें नाथिली .
आणि स्वरूपसत्तेनें चालिली .
ते तुवां गर्भाधानें देखिलीं .
हे वार्ता सांगसी ................(२-२४)
जें जालेचि नाहीं सर्वथा .
तयावरी निर्गुणाची सत्ता .
ऐसें हें ज्ञातेपणे बोलतां .
तुज लाज नाहीं .................(२-२५)
सकळ माया ऐसेंहि म्हणता .
आणि जालीच नाहीं ऐसेंहि सांगतां .
तरी म्या काये करावें आतां .
सांगा स्वामी ......................(२-२६)
अरे ! मनास जें जें अनुभविलें .
तें तें मायिक नाथिलें .
तितके तुंवां टाकिलें .
पाहिजें स्वानुभवें ................(२-२७)
सकळहि माया परी नाथिली .
स्वरूपीं तों नाहीं राहिलीं .
येवं आहे नाहीं हे बोली .
माया जाण ........................(२-२८)
येवं सांगतों तें ऐकावें .
माईक मायेतें जाणावें .
आतां मनन करावेनं .
सावध होउनी .........................(२-२९)
मायेकरितां माया दिसे .
मायेकरितां माया नासे .
मायेकरितां लाभ असे .
परमार्थस्वरूपाचा .....................(२-३०)
माया भवसिंधूचें तारू .
माया पाववी पैलतारू .
मायेवीण उद्धारुं .
प्राणीयास नाहीं .......................(२-३१)
मायेकरितां देव आणि भक्त .
मायेकरितां ज्ञाते विरक्त .
मायेकरितां जीवन्मुक्त .
होत स्वानुभवें ........................(२-३२)
मायेकरितां वेदश्रुति .
मायेकरितां नाना वित्पत्ती .
मायेकरितां होती .
मूढ ते विवेकी ............................(२-३३)
माया परमार्थाचें अंजन .
मायेकरितां जोडे निधान .
मायेकरितां सावधान .
साधक स्वरूपीं .............................(२-३४)
मायेकरितां स्वहित घडे .
मायेकरितां भ्रांती उडे .
मायेकरितां विघडे .
प्रपंचभान .................................(२-३५)
मायेवीण ज्ञान कैचें .
माया जीवन सकळ जीवांचें .
मायेवीण साधकांचें .
कार्य न चलें ............................(२-३६)
मायेवीण परमार्थ जोडे .
हें ऐसें कईंच न घडे .
मायेवीण सहसा नातुडे .
गुज योगियांचें .........................(२-३७)
माया योगियांची माउली .
जेथील तेथें नेऊन घाली .
कृपाळुपणें नाथिली .
आपण होये ............................(२-३८)
सकळ मायेचें स्वरूप जालें .
त्यांत तुझेंहि स्वरूप आलें .
हें इतुकेंहि आपुलें .
नको मानूस सर्वथा ....................(२-३९)
आतां सांगतों तुज खूण .
तुंवां नाशिवंत केलें मदार्पण .
आतां करिसी आळकेपण.
तरी मज शब्द नाहीं ..................(२-४०)
संग तितुका नाशिवंत .
नि:संग शब्द अशाश्वत .
म्हणोनी संग-नि:संगातीत .
होउनी राहे ..............................(२-४१)
आतां पुढील निरूपण .
आदरें करावें श्रवण.
संगातीत होईजेल ते खूण .
सांगिजेल पुढें ...........................(२-४२)
इति श्रीआत्माराम .
रामदासीं विश्रामधाम .
योगी पावती विश्राम .
जयें ठाईं ..............................(२-४३)
समास दुसरा संपूर्ण
II जय जय रघुवीर समर्थ II
II श्रीराम समर्थ II
आत्माराम
समास तिसरा - ब्रह्मनिरूपण
सन्त तितुका नाशिवंत .
सांडून राहवें निवांत .
येकपणाचाहि अंत .
जालियां समाधान ..................(३-१)
येकपणाचा उमस .
काढितां, त्रिपुटी सावकास .
होत आहे, म्हणोनी ध्यास .
येकपणाचा नसो ....................(३-२)
तो मी आत्मा ऐसा हेतु .
हें नाशिवंत टाकी तूं .
उन्मनी अवस्थेचा प्रांतु .
तें स्वरूप तुझें ......................(३-३)
ऐसा जो अनुभव आला .
तोहि नाशिवंतामध्यें आला .
अनुभवा वेगळा राहिला .
तो तूं आत्मा .......................(३-४)
हेंहि न घडें बोलणें .
आतां पार्हेरा किती देणें .
वेद शास्त्रें पुराणें .
तेंहि नासोनि जाती ................(३-५)
ग्रंथ मात्र जितुका बोलिला .
आत्मा त्यावेगळा राहिला .
ये मायेचा स्पर्श जाला .
नाहींच तयासी ......................(३-६)
स्वरूप निर्मळ आणि निघोट .
स्वरूप सेवटाचा सेवट .
जिकडें पहावें तिकडें नीट .
सन्मुखिच आहे .....................(३-७)
जें बहु दुरीचा दुरी .
जें निकटचि जवळीं अंतरी .
दुरी आणि अभ्यांतरी .
संदेहचि नाहीं ........................(३-८)
जें सकळांपरीस मोठें .
जेथें हें सकळहि आटे .
अकस्मात येकसरें तुटे .
मूळ मायेंचें ..........................(३-९)
जें सकळांहून मृदु कोंवळें .
जें सकळाहून अत्यंत जवळें .
जें सकळांमध्ये, परी निराळें .
अलिप्तपणें.............................(३-१०)
जें हालें न चालें .
जें बोले न डोले .
आवघें आपणचि संचिले .
येकलें येकटचि तें ..................(३-११)
जें आकाशासबाह्य भरलें .
आणि आकाश जेथें मुरालें .
आकाश मुरोनिया उरलें .
येकजिनसी आपण .................(३-१२)
जे चळे ना ढळे .
अग्निमध्ये न जळें .
जे चळत्यामध्ये, परी न कळे .
उदकीं बुडेना .........................(३-१३)
जयास कोणीच नेईना .
चोरूं जातां चोरवेना .
कल्पांत जाला तरी वेंचेना .
अणुमात्र ..............................(३-१४)
जें ज्ञानचक्षीं लक्षिलें नव जाये .
जेथें आकार भस्मोनि जाये .
सांगितलें तएं साकार होये .
म्हणोनि सांगणें न घडे ...........(३-१५)
ऐसें जरी न बोलावें .
तरी म्यां काये करावें .
न बोलतां कळावें .
तुज कैसें ?...........................(३-१६)
अरे बोलणें तितुकें वेर्थ जातें .
परी बोलतां बोलतां अनुभवा येतें .
अनुभव सोडितां,
तें आपणचि होईजे .................(३-१७)
मायारूप मूळ तयाचें .
शोधीन म्हणतां समाधान कैचें .
"मज लाभ जाला" या सुखाचे .
मूळ तुटें ..............................(३-१८)
"अहंब्रह्मास्मि" हा गाथा .
आला देहबुधिचिया माथा .
देहबुधिनें परमार्था .
कानकोडें होईजे .....................(३-१९)
देहबुधी हे टाकावी .
हेहि मायेचि उठाठेवी .
म्हणोनि काय अंगीकारावी ?
अंगीकारूं नयें .......................(३-२०)
मायेच्या बळें ब्रह्मज्ञान .
मायेकरितां समाधान .
मायाचि गोंवी, आणि बंधन .
तोडी, तेहि माया ..................(३-२१)
माया आपणास आपण गोंवी .
आपणास आपण वेढां लावी .
प्राणी दुखवती जीवीं.
अभिमानें करूनि ....................(३-२२)
जैसा सारीपाट खेळती .
सारी येकाच्या मागोन आणिती .
खेळों बैसतां वाटून घेतीं .
आपुल्याला ...........................(३-२३)
नसताचि अभिमान माथां .
सारी मरतां परम वेथा .
डाव येतां सुखस्वार्था .
दोघेहि पडिले ........................(३-२४)
फांसयास दे दे म्हणती .
येक ते चिरदॆए येती .
क्रोधां पेटल्या घेती .
जीव येकमेकाचा ....................(३-२५)
तैशा कन्या पुत्र आणि नारी .
वांटून घेतल्या सारी .
अभिमान वाहाती शिरीं .
देहपांग प्रपंचाचा .....................(३-२६)
येवं इतुकी वेढा लाविली .
ते माया खेळे येकली .
ते मायेनेंच वारिली .
पाहिजे माया .........................(३-२७)
ते माया तोडितां आधिक जडे .
म्हणोनि धरिती ते वेडे .
धरितां सोडितां ते नातुडे .
वर्म कळल्यावांचुनि .................(३-२८)
जैसें चक्रविहूचें उगवणें .
बाहेर येउनी आंत जाणें .
कां भीतरीं जाउनी येणें .
अकस्मात बाहेरी ....................(३-२९)
कां त्या कोवाडीयांच्या कडीया .
गुंतगुंतोनि उगवाव्या .
तैसी जाण हे माया .
गुंतोनी उगवावी .....................(३-३०)
माया झाडितां कैसी झाडावी .
तोडून कैसी टाकावी .
येथें विचारें पाहावी .
नाथिलीच हे ........................(३-३१)
बहू नाटकी हे माया .
मीपणें न जाये विलया .
विवेकें पाहातां देहीं या .
ठावोचि नाहीं .......................(३-३२)
वर्म हेंचि माया माईक .
याचा करावा विवेक .
विवेक केलियां, अनेक .
येकीं मुरे ............................(३-३३)
येकीं अनेक आटलें .
येकपण अनेकासवें गेलें .
उपरीं जें नि:संग उरलें .
तेंचि स्वरूप तुझें ..................(३-३४)
तुझें स्वरूप तुजचि न कळे .
तें जया साधनें आकळे .
तें साधन ऐक, सोहळे .
भोगिसी स्वानंदाचे ................(३-३५)
इति श्रीआत्माराम .
सांगेल पुढील साधनवर्म .
जेणें भिन्नत्वाचा भ्रम .
तुटोन जायें .........................(३-३६)
समास तिसरा संपूर्ण
II जय जय रघुवीर समर्थ II
II श्रीराम समर्थ II
आत्माराम
समास चौथा - साधननिरूपण
जें सकळ साधनांचें सार .
जेणें पाविजें पैलपार .
जेणें साधनें अपार .
साधक ते सीध जाले .............(४-१).
तें हें जाण रे श्रवण .
करावे अध्यात्मनिरूपण .
मनन करितां समाधान .
निजध्यासें पावती .................(४-२)
संत सज्जन महानुभावीं .
परमार्थचर्चा करीत जावी .
हईगई सर्वथा न करावी .
ज्ञातेपणेंकरूनी ......................(४-३)
परमार्थ उठाठेवी करितां .
लाभचि आहे तत्त्वतां .
दिवसेदिवस शुधता .
वृत्तीस होये नीच नवी .............(४-४)
श्रवण आणि मनन .
या ऐसें नाहीं साधन .
म्हणोनी हें नित्य नूतन .
केलें पाहिजें .........................(४-५)
जैसी ग्रन्थीं बोलिलें .
तैसेचि स्वयें पाहिजे जालें .
येथें क्रियेंचा माथां आलें .
निश्चितार्थें ............................(४-६)
जे ग्रंथीं जो विचार .
वृत्ती होये तदाकार .
म्हणोनी निरूपण सार .
भक्ति ज्ञान वैराग्य .................(४-७)
तो शिष्य म्हणे स्वामी सर्वज्ञा .
सत्य करावी प्रतिज्ञा .
नाशिवंत घेऊन, साधनां .
वरपडें न करावें ....................(४-८)
अरे शिष्या चीत द्यावें .
नाशिवंत तूंवां वोळखावें .
साधन न लगे करावें .
प्रतिज्ञाच आहे ......................(४-९)
प्रतिज्ञा करावी प्रमाण .
ऐसें बोलतो हा कोण .
नाशिवंत केलें मदार्पण .
त्याहिमध्यें तो आला ............(४-१०)
तूं म्हणसी जें दिधलें .
तरी देयास कोण उरलें .
उरलें तें झुरलें .
मजकडे .............................(४-११)
तूं नाशिवंतामध्यें आलासी .
आपणांस कां रे चोरिसी .
नाशिवंत देतां चकचकीसी .
फट रे पढतमूर्खा ! ...............(४-१२)
शिष्य विचारून बोले .
स्वामी काहींच नाहीं उरलें .
अरे "नाही" बोलणेंहि आलें .
नाशिवंतामध्यें .....................(४-१३)
आहे म्हणतां द्या काहीं .
नाहीं शब्द गेला तोहि .
नाहीं नाहीं म्हणतां कांहीं .
उपजले कीं ! ......................(४-१४)
येथें सुन्याचा निरास जाला .
आत्मा सदोदित संचला .
पाहों जातां साधकाला .
ठावचि नाहीं .......................(४-१५)
अभिन्नज्ञाता तोचि मान्य .
साधक साध्य होतां धन्य .
वेगळेपणें वृत्तिसून्य .
पावती प्राणी .......................(४-१६)
वेगळेपणें पाहों जातां .
मोक्ष न जोडे सर्वथा .
"आत्मा दिसेसा नाहीं " .
मता वरपडे होती प्राणी .........(४-१७)
आपुलिया डोळां जें देखिलें .
तें पंचभूत्तांमध्यें आलें .
ऐसें जाणोनी दृढ धरिलें .
ते नाडलें प्राणी ....................(४-१८)
जो पंचभूतांचा दास .
तयास मायेमध्यें वास .
भोगी नीच नव्या सावकास .
पुनरावृत्ती ............................(४-१९)
तों शिष्यें विनंती केलीं .
म्हणे आशंका उद्भवली .
पंचभूतांची सेवा केलीं .
बहुतेकीं ..............................(४-२०)
सकळ सृष्टीमध्यें जन .
साधु संत आणि सज्जन .
करिती भूतांचे भजन .
धातुपाषाणमूर्ति ....................(४-२१)
जे कोणी नित्यमुक्त जाले .
तेहीं धातुपूजन केलें .
तरी तें पुनरावृत्ती पावले .
किंवा नाहीं ? ......................(४-२२)
ऐसा शिष्याचा अंतर्भाव .
जाणोनि आनंदला गुरुराव .
म्हणे सीघ्रचि हा अनुभव .
पावेल आतां ........................(४-२३)
ऐसें विचारूनिया मनीं .
कृपादृष्टीं न्याहाळुनी .
शिष्याप्रती सुवचनीं .
स्वामी बोलते जाले ...............(४-२४)
प्राणी देह सोडून जाती .
परी वासनात्मक शरीरें उरती .
तेणें पुनरावृत्ती भोगिती .
वासना उरलिया ....................(४-२५)
मूळ या स्थूळदेहाचें .
लिंगदेह वासनात्मक साचें .
राहाणें तया लिंगदेहाचें .
अज्ञानदेहीं ...........................(४-२६)
कारणदेह तोचि अज्ञान .
आणि "तो मी आत्मा" ऐसें ज्ञान .
तया नांव माहाकारण - .
देह बोलिजे ........................(४-२७)
तरी मनाचा थारा तुटला .
म्हणिजे भवसिंधु आटला .
प्राणी निश्चितार्थे सुटला .
पुनरावृत्तीपासुनी ..................(४-२८)
हेंचि जाण भक्तीचें फळ .
जेणें तुटे संसारमूळ .
नि:संग आणि निर्मळ .
आत्मा होईजे स्वयें .............(४-२९)
संगातीत म्हणिजे मोक्ष .
तेथें कैचें देखणे लक्ष .
लक्ष आणि अलक्ष .
या दोहींस ठाव नाहीं ............(४-३०)
आत्मा म्हणोनी देखणीयास मीठी .
घालूं जातां मोक्षाची तुटी .
म्हणोनिया उठाउठी .
आत्मनिवेदन करावें .............(४-३१)
प्राप्त जालें अद्वैतज्ञान .
अभिन्नपणें जें विज्ञान .
तेंचि जाण आत्मनिवेदन .
जेथें मी तूंपण नाहीं .............(४-३२)
ऐसी स्थिती जया पुरुषाची .
तया पुनरावृत्ती कैंची .
जाणोनि भक्ति केली, दासाची .
आवडी देवास अत्यंत ...........(४-३३)
पूर्वी दासत्व होतें केलें .
त्यांचें स्वामीत्व प्राप्त जालें .
आणि तयाचें महत्त्व रक्षिलें .
तरीं थोर उपकार कीं ............(४-३४)
आतां असो हे बोलणें .
नाशिवंताचा विचार घेणें .
आणि मजपासी सांगणें .
अनुभव आपुला ...................(४-३५)
आतां पुढिलिये समासीं
शिष्य सांगेल अनुभवासी .
दृढ करूनिया तयासी .
सांगती स्वामी .....................(४-३६)
इति श्रीआत्माराम .
रामदासीं पूर्णकाम .
ऐका सावध वर्म .
आत्मज्ञानाचें .......................(४-३७)
समास चौथा संपूर्ण
II जय जय रघुवीर समर्थ II
II श्रीराम समर्थ II
आत्माराम
समास पाचवा -स्वानुभवनिरूपण
जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा .
आम्हां अनाथियांचिया माहैरा .
सार्थक जालें जी दातारा .
तुमच्या कृपा कटाक्षें .............(५-१)
या मनाचेनि संगती .
जन्म घेतले पुनरावृत्ति .
माया माईक असोन, भ्रान्ती .
वरपडा जालों होतों ...............(५-२)
जी मी मानवी किंकर .
येकायेकीं जालों विश्वंभर .
संदेह तुटला थोर .
यातायातीचा ........................(५-३)
मी संसारीहून सुटलों .
पैलपार पावलों .
मीच सकळ विस्तारलों .
सर्वाभूतीं ............................(५-४)
मी करून अकर्ता .
मी परेहून पर्ता .
मजमध्यें वार्ता .
मीपणाची नाहीं ....................(५-५)
ऐसें जे निजबीज .
गाळीव मीपणाचा फुंज .
तो मुरालियां सहज .
सीधचि आदिअंती .................(५-६)
ऐसा शिष्याचा संकल्पु .
जाणोनि बोले भवरिपु .
संसारसर्प भग्नदर्पु .
केला जेणें ..........................(५-७)
जें स्वामीच्या हृदईं होतें .
तें शिष्यासी बाणलें अवचीतें .
जैसें सामर्थ्य परीसातें .
लोहो आंगी बाणे ..................(५-८)
स्वामीपरीसाचा स्पर्श होतां .
शिष्य परीसचि जाला तत्वतां .
गुरुशिष्याची ऐक्यता .
जाली स्वानुभवें ...................(५-९)
गुज स्वामीच्या हृदईंचें .
शिष्यास वर्म तयाचें .
प्राप्त जालें योगीयांचें .
निजबीज ...........................(५-१०)
बहुता जन्मांच्या शेवटी ।
जाली स्वरूपेसी भेटी ।
एका भावार्थासाठी ।
परब्रह्म जोडले ।। ११।।
(this stanza 5/12 was added on 09-06-2017,
so let it remain as I got it)
जो वेदशास्त्रांचा गर्भ .
निर्गुण परमात्मा स्वयंभ .
तयाचा येकसरां लाभ .
जाला सद्भावें .......................(५-१२)
(**see Note2)
जें ब्रह्मादिकांचें माहेर .
अनंत सुखाचें भांडार .
जेणें हा दुर्गम संसार .
सुखरूप होये .......................(५-१३)
ऐसें जयास ज्ञान जालेम .
तयाचें बंधन तुटलें .
येरा नसोनीच जडलें .
सदृढ अविवेकें .....................(५-१४)
संदेह हेचि बंधन .
निशेष तुटला तेंचि ज्ञान .
नि:संदेही समाधान .
होये आपैसे .........................(५-१५)
प्राणीयास माया सुटेना .
अभिमानें त्रिपुटी तुटेना .
वृत्ति स्वरूपीं फुटेना .
स्फूर्तिरूपे ............................(५-१६)
जें मायाजाळीं पडलें .
ते ईश्वरासी चुकलें .
ते प्राणी सांपडलें .
वासनाबंधनी ........................(५-१७)
जयाचें दैव उदेलें .
तयास ज्ञान प्राप्त जालें .
तयाचें बन्धन तुटलें .
नि:संगपणें ..........................(५-१८)
सर्वसाक्षी तुर्या अवस्था .
तयेचाहि तूं जाणता .
म्हणोनी तुज नि:संगता .
सहजचि आली .....................(५-१९)
आपणासी तूं जाणसी .
तरी तूं ही नव्हेसी .
तूंपणाची कायेसी .
मात स्वरूपीं ........................(५-२०)
जाणता आणि वस्तु
दोनीं निमाल्यां उर्वरीतु .
तूंपणाची मातु .
सहजचि वाव .....................(५-२१)
आतां असो शब्दपाल्हाळ .
तुझें तुटलें जन्ममूळ .
कां जें नाशिवंत सकळ .
मदार्पण केलें .....................(५-२२)
जें जें जाणोनि टाकिलें .
तें तें नाशिवंत, राहिलें .
तुझें तुज प्राप्त जालें .
अक्षई पद .........................(५-२३)
ऐसें बोलें मोक्षपाणी .
ऐकोन शिष्य लोटांगणीं .
नि:संदेह स्वरूपमिळणीं .
दोघे येकचि जाले ................(५-२४)
ऐसा कृपाळू स्वामीराव .
आदिपुरुष देवाधिदेव .
शिष्यास निजपदीं ठाव .
ऐक्यरूपें दिधला ..................(५-२५)
जो शिष्य स्वामीस शरण गेला .
आणि संदेहावेगळा जाला .
तेणें जन्म सार्थक केला .
जो देवासी दुल्लभु ...............(५-२६)
ग्रंथ संपतां स्तुतिउत्तरें .
बोलताती अपारें .
परी अर्थासी कारण, येरें .
येरा चाड नाहीं ....................(५-२७)
इति श्री आत्माराम .
रामदासीं पूर्णकाम .
नि:संदेह जालें अंतर्याम .
सद्गुरुचरणीं .........................(५-२८)
II श्रीसद्गुरुनाथार्पणमस्तु II
II तथास्तु - तथास्तु - तथास्तु II
II समास पाचवा संपूर्ण II
II जय जय रघुवीर समर्थ II
_____________________________________
------------------------------ॐ------------------------
_____________________________________
Next Post - "Amrutanubhava-अमृतानुभव "
______________________________________
***************************************
आत्माराम
II श्रीराम समर्थ II
आत्माराम
समास पहिला - त्यागनिरूपण
जयास लटिका आळ आला .
जो मायागौरीपासून जाला .
जालाचि नाहीं तया अरूपाला .
रूप कैंचें ?.......................(१-१)
तेथें स्तवनाचा विचार .
न घडे निर्विकारीं विकार .
परी तयास नमस्कार .
भावबळें माझा ..........................(१-२)
जयाचेनि वेदशास्त्रपुराणें .
जयाचेनि नाना निरूपणें .
जयाचेनि स्वसुखा लाधणें .
शब्दीं निःशब्द .....................(१-३)
जें शब्दास आकळेंना .
जें शब्देवीण सहसा कळेंना .
कळले ऐसेंहि घडेना .
जियें स्वरूपी ..............................(१-४)
ऐसें सदा सर्वत्र संचलें .
जे तर्का न वचे अनुमानलें .
तें जयेचेनि प्राप्त जालें .
आपरूप आपणासी ....................(१-५)
नमन तिचिया निजपदां .
माया वाग्देवी शारदा .
जयेचेनि प्रवर्तती संवादा .
संत महानुभाव .....................(१-६)
आतां वंदीन सद्गुरुस्वामी .
जेथें "राहिलें" तोचि मी .
आणि निवारिलीं निजधामीं .
पांचहि जेणें ......................(१-७)
तया निजपदाकडे .
आनंदें वृत्ति वावडे .
पद लाधलियां जडे .
तद्रूप होउनी ................................(१-८)
स्वामीकृपेचा लोट आला .
मज सरोवरी सामावला .
पूर्ण जालियां उचंबळला .
अनुभव उद्गार .........................(१-९)
माझें सद्गुरुकृपेचें बळ .
मजमाजी सांठवलें तुंबळ .
तेणें बळें स्वानंदजळ .
हेलाऊं लागे .............................(१-१०)
आता नमस्कारीन राम .
जो योगियांचें निजधाम .
विश्रांती पावे विश्राम .
जये ठायीं .................................(१-११)
जो नावारूपावेगळा .
जो ये मायेहून निराळा .
जेथें जाणिवेची कळा .
सर्वथा न चले ..........................(१-१२)
जेथें भांबावला तर्क .
जेथें पांगुळला विवेक .
तेथें शब्दांचें कौतुक .
केंवी घडें ?................................(१-१३)
जयालागी योगी उदास .
वनवासी फिरती तापस .
नाना साधनीं सायास .
जयाकारणें करिती ..................(१-१४)
ऐसा सर्वात्मा श्रीराम .
सगुण निर्गुण पूर्णकाम .
उपमाच नहीं निरोपम .
रूप जयाचें .............................(१-१५)
आतां वंदीन संत सज्जन श्रोते .
जे कृपाळू भावाचे भोक्ते .
माझीं वचनें पराकृतें .
सांगेन तयापासीं ......................(१-१६)
तयांचें वर्णावे स्वरूप .
तरी ते स्वरूपाचे बाप .
जे वेदांसि सांगवेना रूप .
तें जयाचेनि प्रगटें ...............(१-१७)
आतां शिष्या सावधान .
ऐक सांगतों गुह्यज्ञान .
जेणें तुझे समाधान .
आंगीं बाणे ..............................(१-१८)
तुवां आशंका नाहीं घेतली .
परंतु मज तुझी चिंता लागली .
कां जें तुझी भ्रान्ति फिटली .
नाहींच अद्यापि ................(१-१९)
दासबोधीचे समासी .
निर्मूळ केलें मीपणासी .
तया निरूपणेंहि वृत्तीसी .
पालट दिसेना .....................(१-२०)
म्हणोनि न पुसतां सांगणें .
घडलें शिष्या तुजकारणें .
आतां तरी सोये धरणें .
श्रवणमननाची .....................(१-२१)
चातकपक्षी वरीचावरी .
चंचु पसरून थेंबुटाधरी .
जीवन सकळहि अव्हेरी .
भूमंडळींचें .......................(१-२२)
तैसा शब्दवरूषाव होता .
असों नेदवीं वेग्रता .
श्रवणपुटीं सामावितां .
मनन करावें ..........................(१-२३)
लागवेग जाणोन शब्दाचा .
आवांका पाहावा मनाचा .
शब्दाआंतील गर्भाचा .
सांटावा घ्यावा ........................(१-२४)
अरे तू कोण कोणाचा .
कोठून आलासी कैंचा .
ऐसा विचार पूर्वीचा .
घेई बापा ...............................(१-२५)
अरे तां जन्मांतर घेतलें .
काय मानितोसि आपुलें .
ऐसें तुवां विचारिलें .
पाहिजे आतां ..........................(१-२६)
येथें तुझें काहींच नाहीं .
भुलला आहेस काई .
चुकोन आलासी, जाई .
जेथीचा तेंथें..........................(१-२७)
तू समर्थाचें लेकरूं .
अभिमानानें घेतला संसारु .
अभिमान टाकितां पैलपारु .
पावशील बापा ...............(१-२८)
ईश्वरापासून जालासी .
परी तूं तयासी चुकलासी .
म्हणोनी हे दु:ख भोगिसी .
वेगळेपणें उत्कट .............(१-२९)
त्यागिसी सकळ वैभवाला .
आणि विश्वाससी माझिया बोला .
तरी मी घालीन रे तुजला .
जेथील तेथें ...................(१-३०)
तुझे अढळपद गेलें .
तुज मायेनें वेढां लाविलें .
तें जरी तुझें तुज दिधलें .
तरी मज काय देसी ..........(१-३१)
जितुकें काहीं नासोन जाईल .
जें अशाश्वत असेल .
तुजसमागमें न येईल .
तितुके द्यावे मज .................(१-३२)
मजहिं तें कायें करावें .
परी तुजपासून टाकवावें .
तुंवां टाकिलें तरी न्यावें .
तुज समागमे ...................(१-३३)
अरे भूषण भिक्षेचें सांडिलें .
आणि राजपद प्राप्त जालें .
तरी तुझे काये गेलें .
सांग बापा .........................(१-३४)
नाशिवंत तितुकेंचि देसी .
तरी पद प्राप्त निश्चयेंसी .
त्यामध्ये लालुच करिसी .
तरी स्वहित न घडे ..........(१-३५)
तों शिष्य म्हणे जी दिधलें .
स्वामी म्हणती पद लाधलें .
आतां तूं आपुलें .
काहीं मानू नको .........................(१-३६)
इतुके स्वामी बोलिलें .
आज्ञा घेऊन निघालें .
तंव शिष्ये विनविलें .
विनीत होउनी ......................(१-३७)
आतां पुढिलियें समासी .
संवाद होईल उभयतांसी .
तेणें स्वानंद सिंधुसि .
भरितें दाटे बळें ..................(१-३८)
इतिश्री आत्माराम .
रामदासी पूर्णकाम .
ऐका सावध, वर्म .
सांगिजेल ..........................(१-३९)
समास पहिला संपूर्ण
II जय जय रघुवीर समर्थ II
II श्रीराम समर्थ II
आत्माराम
समास दुसरा - मायानिरूपण
जय जय जी सच्चिदानंदा .
जय जयजी आनंदकंदा .
जय जय जी निजबोधा .
परमपुरुषा .......................(२-१)
अनंत ब्रह्मांडाऐंसी ढिसाळें .
मायेनें रचिलीं विशाळें .
तें तुमचे कृपेचेनि बळें .
विरतीं स्वानंदडोहीं...............(२-२)
आतां स्वामीनें जें काहीं इच्छिलें .
तें पाहिजें अंगीकारिलें .
शरणागत आपुलें .
समर्थें उपेक्षूं नयें ................(२-३)
नाशिवंत काये म्या टाकावें .
तें मज स्वामीनें सांगावें .
मज दातारें करावें .
आपणा ऐसें ......................(२-४)
ऐकोन शिष्याचें बोलणें.
स्वामी म्हणती सावध होणें .
अवधान देऊन घेणें .
आनंदपद ..........................(२-५)
शिष्या बहू मन घाली .
आतां बाष्कळता राहिली .
येथें वृत्ति चंचल केली .
तरी बुडसी संदेहसागरी ..........(२-६)
अग्निसंगे लोहो पिटे .
तेणें तयाचा मळ तुटे .
मग परिसेसीं झगटता पालटे .
लोखंडणा तयाचें ....................(२-७)
तयाचा मळ झडेना .
आणि अभ्यांतर कळेना .
तरी तें सहसा पालटेंना .
मृत्तिकारूपें .......................(२-८)
म्हणउन नाशिवंत तितुका मळ .
तुंवां तजावा अमंगळ .
तो गेलिया तूंच "केवळ" .
आहेस बापा ......................(२-९)
तरी नाशिवंत तें तू जाण माया .
माईक जाये विलया .
ते मायेचा विचार प्राणसखया .
ऐक सांगतों .....................(२-१०)
"अहं" ऐसें जें स्फुरण .
तेंचि मायेंचें लक्षण .
तये मायेपसून त्रिगुण .
गुणापासून भूतें .................(२-११)
पृथ्वी आप तेज वायो आकाश .
सृष्टि रचिली सावकास .
येथें दृश्य आणि अदृश्य .
सकळ माया ...................(२-१२)
येक माया दों ठायीं वाटलीं .
प्रकुर्ती आणि पुरुष जालीं .
जैसीं दों दिसांची बोली .
येकचि परवा ....................(२-१३)
माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान .
माया ध्याता ध्येय ध्यान .
माया हेंचि समाधान .
योगियांचें ............................(२-१४)
माया सच्चिदानंद .
माया आनंदाचा कंद .
माया हेचि निजबोध .
शब्दरूपें ..............................(२-१५)
आत्मा ब्रह्म आणि स्वरूप .
हेंहि मायेचेंचि रूप .
रूप आणि अरूप सकळ माया ...(२-१६)
जीव आणि ईश्वर .
हाहि मायेचाचि विस्तार .
विश्वरूप विश्वंभर .
अवघी माया ..........................(२-१७)
माया मनास चाळक .
माया बुधीस व्यापक .
माया येकीं अनेक .
ऐसें बोलणें ...........................(२-१८)
मायेनेंचि माया चाले .
मायेनेंचि माया बोले .
मायेनेंचि माया हाले .
वायोरूपें ...............................(२-२०)
(*see Note1)
तों शिष्य म्हणे जी ताता .
माया चाले स्वरूपसत्ता .
अरे ! सत्ता तेचि तत्त्वतां .
माय जाण ......................(२-२१)
तरी मायेनें स्वइच्छ्या असावें .
आणि स्वरूपसत्तेंने नसावें.
मनास आलें तैसें करावें .
हें केंवी घडे ?....................(२-२२)
खर्यावरी लटिकें चौताळलें .
लटिकें मर्यादानें राहिलें .
ते तुंवां गर्भाधानें देखिलें .
हे अघटित वार्ता ...............(२-२३)
तैसी माया हें नाथिली .
आणि स्वरूपसत्तेनें चालिली .
ते तुवां गर्भाधानें देखिलीं .
हे वार्ता सांगसी ................(२-२४)
जें जालेचि नाहीं सर्वथा .
तयावरी निर्गुणाची सत्ता .
ऐसें हें ज्ञातेपणे बोलतां .
तुज लाज नाहीं .................(२-२५)
सकळ माया ऐसेंहि म्हणता .
आणि जालीच नाहीं ऐसेंहि सांगतां .
तरी म्या काये करावें आतां .
सांगा स्वामी ......................(२-२६)
अरे ! मनास जें जें अनुभविलें .
तें तें मायिक नाथिलें .
तितके तुंवां टाकिलें .
पाहिजें स्वानुभवें ................(२-२७)
सकळहि माया परी नाथिली .
स्वरूपीं तों नाहीं राहिलीं .
येवं आहे नाहीं हे बोली .
माया जाण ........................(२-२८)
येवं सांगतों तें ऐकावें .
माईक मायेतें जाणावें .
आतां मनन करावेनं .
सावध होउनी .........................(२-२९)
मायेकरितां माया दिसे .
मायेकरितां माया नासे .
मायेकरितां लाभ असे .
परमार्थस्वरूपाचा .....................(२-३०)
माया भवसिंधूचें तारू .
माया पाववी पैलतारू .
मायेवीण उद्धारुं .
प्राणीयास नाहीं .......................(२-३१)
मायेकरितां देव आणि भक्त .
मायेकरितां ज्ञाते विरक्त .
मायेकरितां जीवन्मुक्त .
होत स्वानुभवें ........................(२-३२)
मायेकरितां वेदश्रुति .
मायेकरितां नाना वित्पत्ती .
मायेकरितां होती .
मूढ ते विवेकी ............................(२-३३)
माया परमार्थाचें अंजन .
मायेकरितां जोडे निधान .
मायेकरितां सावधान .
साधक स्वरूपीं .............................(२-३४)
मायेकरितां स्वहित घडे .
मायेकरितां भ्रांती उडे .
मायेकरितां विघडे .
प्रपंचभान .................................(२-३५)
मायेवीण ज्ञान कैचें .
माया जीवन सकळ जीवांचें .
मायेवीण साधकांचें .
कार्य न चलें ............................(२-३६)
मायेवीण परमार्थ जोडे .
हें ऐसें कईंच न घडे .
मायेवीण सहसा नातुडे .
गुज योगियांचें .........................(२-३७)
माया योगियांची माउली .
जेथील तेथें नेऊन घाली .
कृपाळुपणें नाथिली .
आपण होये ............................(२-३८)
सकळ मायेचें स्वरूप जालें .
त्यांत तुझेंहि स्वरूप आलें .
हें इतुकेंहि आपुलें .
नको मानूस सर्वथा ....................(२-३९)
आतां सांगतों तुज खूण .
तुंवां नाशिवंत केलें मदार्पण .
आतां करिसी आळकेपण.
तरी मज शब्द नाहीं ..................(२-४०)
संग तितुका नाशिवंत .
नि:संग शब्द अशाश्वत .
म्हणोनी संग-नि:संगातीत .
होउनी राहे ..............................(२-४१)
आतां पुढील निरूपण .
आदरें करावें श्रवण.
संगातीत होईजेल ते खूण .
सांगिजेल पुढें ...........................(२-४२)
इति श्रीआत्माराम .
रामदासीं विश्रामधाम .
योगी पावती विश्राम .
जयें ठाईं ..............................(२-४३)
समास दुसरा संपूर्ण
II जय जय रघुवीर समर्थ II
II श्रीराम समर्थ II
आत्माराम
समास तिसरा - ब्रह्मनिरूपण
सन्त तितुका नाशिवंत .
सांडून राहवें निवांत .
येकपणाचाहि अंत .
जालियां समाधान ..................(३-१)
येकपणाचा उमस .
काढितां, त्रिपुटी सावकास .
होत आहे, म्हणोनी ध्यास .
येकपणाचा नसो ....................(३-२)
तो मी आत्मा ऐसा हेतु .
हें नाशिवंत टाकी तूं .
उन्मनी अवस्थेचा प्रांतु .
तें स्वरूप तुझें ......................(३-३)
ऐसा जो अनुभव आला .
तोहि नाशिवंतामध्यें आला .
अनुभवा वेगळा राहिला .
तो तूं आत्मा .......................(३-४)
हेंहि न घडें बोलणें .
आतां पार्हेरा किती देणें .
वेद शास्त्रें पुराणें .
तेंहि नासोनि जाती ................(३-५)
ग्रंथ मात्र जितुका बोलिला .
आत्मा त्यावेगळा राहिला .
ये मायेचा स्पर्श जाला .
नाहींच तयासी ......................(३-६)
स्वरूप निर्मळ आणि निघोट .
स्वरूप सेवटाचा सेवट .
जिकडें पहावें तिकडें नीट .
सन्मुखिच आहे .....................(३-७)
जें बहु दुरीचा दुरी .
जें निकटचि जवळीं अंतरी .
दुरी आणि अभ्यांतरी .
संदेहचि नाहीं ........................(३-८)
जें सकळांपरीस मोठें .
जेथें हें सकळहि आटे .
अकस्मात येकसरें तुटे .
मूळ मायेंचें ..........................(३-९)
जें सकळांहून मृदु कोंवळें .
जें सकळाहून अत्यंत जवळें .
जें सकळांमध्ये, परी निराळें .
अलिप्तपणें.............................(३-१०)
जें हालें न चालें .
जें बोले न डोले .
आवघें आपणचि संचिले .
येकलें येकटचि तें ..................(३-११)
जें आकाशासबाह्य भरलें .
आणि आकाश जेथें मुरालें .
आकाश मुरोनिया उरलें .
येकजिनसी आपण .................(३-१२)
जे चळे ना ढळे .
अग्निमध्ये न जळें .
जे चळत्यामध्ये, परी न कळे .
उदकीं बुडेना .........................(३-१३)
जयास कोणीच नेईना .
चोरूं जातां चोरवेना .
कल्पांत जाला तरी वेंचेना .
अणुमात्र ..............................(३-१४)
जें ज्ञानचक्षीं लक्षिलें नव जाये .
जेथें आकार भस्मोनि जाये .
सांगितलें तएं साकार होये .
म्हणोनि सांगणें न घडे ...........(३-१५)
ऐसें जरी न बोलावें .
तरी म्यां काये करावें .
न बोलतां कळावें .
तुज कैसें ?...........................(३-१६)
अरे बोलणें तितुकें वेर्थ जातें .
परी बोलतां बोलतां अनुभवा येतें .
अनुभव सोडितां,
तें आपणचि होईजे .................(३-१७)
मायारूप मूळ तयाचें .
शोधीन म्हणतां समाधान कैचें .
"मज लाभ जाला" या सुखाचे .
मूळ तुटें ..............................(३-१८)
"अहंब्रह्मास्मि" हा गाथा .
आला देहबुधिचिया माथा .
देहबुधिनें परमार्था .
कानकोडें होईजे .....................(३-१९)
देहबुधी हे टाकावी .
हेहि मायेचि उठाठेवी .
म्हणोनि काय अंगीकारावी ?
अंगीकारूं नयें .......................(३-२०)
मायेच्या बळें ब्रह्मज्ञान .
मायेकरितां समाधान .
मायाचि गोंवी, आणि बंधन .
तोडी, तेहि माया ..................(३-२१)
माया आपणास आपण गोंवी .
आपणास आपण वेढां लावी .
प्राणी दुखवती जीवीं.
अभिमानें करूनि ....................(३-२२)
जैसा सारीपाट खेळती .
सारी येकाच्या मागोन आणिती .
खेळों बैसतां वाटून घेतीं .
आपुल्याला ...........................(३-२३)
नसताचि अभिमान माथां .
सारी मरतां परम वेथा .
डाव येतां सुखस्वार्था .
दोघेहि पडिले ........................(३-२४)
फांसयास दे दे म्हणती .
येक ते चिरदॆए येती .
क्रोधां पेटल्या घेती .
जीव येकमेकाचा ....................(३-२५)
तैशा कन्या पुत्र आणि नारी .
वांटून घेतल्या सारी .
अभिमान वाहाती शिरीं .
देहपांग प्रपंचाचा .....................(३-२६)
येवं इतुकी वेढा लाविली .
ते माया खेळे येकली .
ते मायेनेंच वारिली .
पाहिजे माया .........................(३-२७)
ते माया तोडितां आधिक जडे .
म्हणोनि धरिती ते वेडे .
धरितां सोडितां ते नातुडे .
वर्म कळल्यावांचुनि .................(३-२८)
जैसें चक्रविहूचें उगवणें .
बाहेर येउनी आंत जाणें .
कां भीतरीं जाउनी येणें .
अकस्मात बाहेरी ....................(३-२९)
कां त्या कोवाडीयांच्या कडीया .
गुंतगुंतोनि उगवाव्या .
तैसी जाण हे माया .
गुंतोनी उगवावी .....................(३-३०)
माया झाडितां कैसी झाडावी .
तोडून कैसी टाकावी .
येथें विचारें पाहावी .
नाथिलीच हे ........................(३-३१)
बहू नाटकी हे माया .
मीपणें न जाये विलया .
विवेकें पाहातां देहीं या .
ठावोचि नाहीं .......................(३-३२)
वर्म हेंचि माया माईक .
याचा करावा विवेक .
विवेक केलियां, अनेक .
येकीं मुरे ............................(३-३३)
येकीं अनेक आटलें .
येकपण अनेकासवें गेलें .
उपरीं जें नि:संग उरलें .
तेंचि स्वरूप तुझें ..................(३-३४)
तुझें स्वरूप तुजचि न कळे .
तें जया साधनें आकळे .
तें साधन ऐक, सोहळे .
भोगिसी स्वानंदाचे ................(३-३५)
इति श्रीआत्माराम .
सांगेल पुढील साधनवर्म .
जेणें भिन्नत्वाचा भ्रम .
तुटोन जायें .........................(३-३६)
समास तिसरा संपूर्ण
II जय जय रघुवीर समर्थ II
II श्रीराम समर्थ II
आत्माराम
समास चौथा - साधननिरूपण
जें सकळ साधनांचें सार .
जेणें पाविजें पैलपार .
जेणें साधनें अपार .
साधक ते सीध जाले .............(४-१).
तें हें जाण रे श्रवण .
करावे अध्यात्मनिरूपण .
मनन करितां समाधान .
निजध्यासें पावती .................(४-२)
संत सज्जन महानुभावीं .
परमार्थचर्चा करीत जावी .
हईगई सर्वथा न करावी .
ज्ञातेपणेंकरूनी ......................(४-३)
परमार्थ उठाठेवी करितां .
लाभचि आहे तत्त्वतां .
दिवसेदिवस शुधता .
वृत्तीस होये नीच नवी .............(४-४)
श्रवण आणि मनन .
या ऐसें नाहीं साधन .
म्हणोनी हें नित्य नूतन .
केलें पाहिजें .........................(४-५)
जैसी ग्रन्थीं बोलिलें .
तैसेचि स्वयें पाहिजे जालें .
येथें क्रियेंचा माथां आलें .
निश्चितार्थें ............................(४-६)
जे ग्रंथीं जो विचार .
वृत्ती होये तदाकार .
म्हणोनी निरूपण सार .
भक्ति ज्ञान वैराग्य .................(४-७)
तो शिष्य म्हणे स्वामी सर्वज्ञा .
सत्य करावी प्रतिज्ञा .
नाशिवंत घेऊन, साधनां .
वरपडें न करावें ....................(४-८)
अरे शिष्या चीत द्यावें .
नाशिवंत तूंवां वोळखावें .
साधन न लगे करावें .
प्रतिज्ञाच आहे ......................(४-९)
प्रतिज्ञा करावी प्रमाण .
ऐसें बोलतो हा कोण .
नाशिवंत केलें मदार्पण .
त्याहिमध्यें तो आला ............(४-१०)
तूं म्हणसी जें दिधलें .
तरी देयास कोण उरलें .
उरलें तें झुरलें .
मजकडे .............................(४-११)
तूं नाशिवंतामध्यें आलासी .
आपणांस कां रे चोरिसी .
नाशिवंत देतां चकचकीसी .
फट रे पढतमूर्खा ! ...............(४-१२)
शिष्य विचारून बोले .
स्वामी काहींच नाहीं उरलें .
अरे "नाही" बोलणेंहि आलें .
नाशिवंतामध्यें .....................(४-१३)
आहे म्हणतां द्या काहीं .
नाहीं शब्द गेला तोहि .
नाहीं नाहीं म्हणतां कांहीं .
उपजले कीं ! ......................(४-१४)
येथें सुन्याचा निरास जाला .
आत्मा सदोदित संचला .
पाहों जातां साधकाला .
ठावचि नाहीं .......................(४-१५)
अभिन्नज्ञाता तोचि मान्य .
साधक साध्य होतां धन्य .
वेगळेपणें वृत्तिसून्य .
पावती प्राणी .......................(४-१६)
वेगळेपणें पाहों जातां .
मोक्ष न जोडे सर्वथा .
"आत्मा दिसेसा नाहीं " .
मता वरपडे होती प्राणी .........(४-१७)
आपुलिया डोळां जें देखिलें .
तें पंचभूत्तांमध्यें आलें .
ऐसें जाणोनी दृढ धरिलें .
ते नाडलें प्राणी ....................(४-१८)
जो पंचभूतांचा दास .
तयास मायेमध्यें वास .
भोगी नीच नव्या सावकास .
पुनरावृत्ती ............................(४-१९)
तों शिष्यें विनंती केलीं .
म्हणे आशंका उद्भवली .
पंचभूतांची सेवा केलीं .
बहुतेकीं ..............................(४-२०)
सकळ सृष्टीमध्यें जन .
साधु संत आणि सज्जन .
करिती भूतांचे भजन .
धातुपाषाणमूर्ति ....................(४-२१)
जे कोणी नित्यमुक्त जाले .
तेहीं धातुपूजन केलें .
तरी तें पुनरावृत्ती पावले .
किंवा नाहीं ? ......................(४-२२)
ऐसा शिष्याचा अंतर्भाव .
जाणोनि आनंदला गुरुराव .
म्हणे सीघ्रचि हा अनुभव .
पावेल आतां ........................(४-२३)
ऐसें विचारूनिया मनीं .
कृपादृष्टीं न्याहाळुनी .
शिष्याप्रती सुवचनीं .
स्वामी बोलते जाले ...............(४-२४)
प्राणी देह सोडून जाती .
परी वासनात्मक शरीरें उरती .
तेणें पुनरावृत्ती भोगिती .
वासना उरलिया ....................(४-२५)
मूळ या स्थूळदेहाचें .
लिंगदेह वासनात्मक साचें .
राहाणें तया लिंगदेहाचें .
अज्ञानदेहीं ...........................(४-२६)
कारणदेह तोचि अज्ञान .
आणि "तो मी आत्मा" ऐसें ज्ञान .
तया नांव माहाकारण - .
देह बोलिजे ........................(४-२७)
तरी मनाचा थारा तुटला .
म्हणिजे भवसिंधु आटला .
प्राणी निश्चितार्थे सुटला .
पुनरावृत्तीपासुनी ..................(४-२८)
हेंचि जाण भक्तीचें फळ .
जेणें तुटे संसारमूळ .
नि:संग आणि निर्मळ .
आत्मा होईजे स्वयें .............(४-२९)
संगातीत म्हणिजे मोक्ष .
तेथें कैचें देखणे लक्ष .
लक्ष आणि अलक्ष .
या दोहींस ठाव नाहीं ............(४-३०)
आत्मा म्हणोनी देखणीयास मीठी .
घालूं जातां मोक्षाची तुटी .
म्हणोनिया उठाउठी .
आत्मनिवेदन करावें .............(४-३१)
प्राप्त जालें अद्वैतज्ञान .
अभिन्नपणें जें विज्ञान .
तेंचि जाण आत्मनिवेदन .
जेथें मी तूंपण नाहीं .............(४-३२)
ऐसी स्थिती जया पुरुषाची .
तया पुनरावृत्ती कैंची .
जाणोनि भक्ति केली, दासाची .
आवडी देवास अत्यंत ...........(४-३३)
पूर्वी दासत्व होतें केलें .
त्यांचें स्वामीत्व प्राप्त जालें .
आणि तयाचें महत्त्व रक्षिलें .
तरीं थोर उपकार कीं ............(४-३४)
आतां असो हे बोलणें .
नाशिवंताचा विचार घेणें .
आणि मजपासी सांगणें .
अनुभव आपुला ...................(४-३५)
आतां पुढिलिये समासीं
शिष्य सांगेल अनुभवासी .
दृढ करूनिया तयासी .
सांगती स्वामी .....................(४-३६)
इति श्रीआत्माराम .
रामदासीं पूर्णकाम .
ऐका सावध वर्म .
आत्मज्ञानाचें .......................(४-३७)
समास चौथा संपूर्ण
II जय जय रघुवीर समर्थ II
II श्रीराम समर्थ II
आत्माराम
समास पाचवा -स्वानुभवनिरूपण
जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा .
आम्हां अनाथियांचिया माहैरा .
सार्थक जालें जी दातारा .
तुमच्या कृपा कटाक्षें .............(५-१)
या मनाचेनि संगती .
जन्म घेतले पुनरावृत्ति .
माया माईक असोन, भ्रान्ती .
वरपडा जालों होतों ...............(५-२)
जी मी मानवी किंकर .
येकायेकीं जालों विश्वंभर .
संदेह तुटला थोर .
यातायातीचा ........................(५-३)
मी संसारीहून सुटलों .
पैलपार पावलों .
मीच सकळ विस्तारलों .
सर्वाभूतीं ............................(५-४)
मी करून अकर्ता .
मी परेहून पर्ता .
मजमध्यें वार्ता .
मीपणाची नाहीं ....................(५-५)
ऐसें जे निजबीज .
गाळीव मीपणाचा फुंज .
तो मुरालियां सहज .
सीधचि आदिअंती .................(५-६)
ऐसा शिष्याचा संकल्पु .
जाणोनि बोले भवरिपु .
संसारसर्प भग्नदर्पु .
केला जेणें ..........................(५-७)
जें स्वामीच्या हृदईं होतें .
तें शिष्यासी बाणलें अवचीतें .
जैसें सामर्थ्य परीसातें .
लोहो आंगी बाणे ..................(५-८)
स्वामीपरीसाचा स्पर्श होतां .
शिष्य परीसचि जाला तत्वतां .
गुरुशिष्याची ऐक्यता .
जाली स्वानुभवें ...................(५-९)
गुज स्वामीच्या हृदईंचें .
शिष्यास वर्म तयाचें .
प्राप्त जालें योगीयांचें .
निजबीज ...........................(५-१०)
बहुता जन्मांच्या शेवटी ।
जाली स्वरूपेसी भेटी ।
एका भावार्थासाठी ।
परब्रह्म जोडले ।। ११।।
(this stanza 5/12 was added on 09-06-2017,
so let it remain as I got it)
जो वेदशास्त्रांचा गर्भ .
निर्गुण परमात्मा स्वयंभ .
तयाचा येकसरां लाभ .
जाला सद्भावें .......................(५-१२)
(**see Note2)
जें ब्रह्मादिकांचें माहेर .
अनंत सुखाचें भांडार .
जेणें हा दुर्गम संसार .
सुखरूप होये .......................(५-१३)
ऐसें जयास ज्ञान जालेम .
तयाचें बंधन तुटलें .
येरा नसोनीच जडलें .
सदृढ अविवेकें .....................(५-१४)
संदेह हेचि बंधन .
निशेष तुटला तेंचि ज्ञान .
नि:संदेही समाधान .
होये आपैसे .........................(५-१५)
प्राणीयास माया सुटेना .
अभिमानें त्रिपुटी तुटेना .
वृत्ति स्वरूपीं फुटेना .
स्फूर्तिरूपे ............................(५-१६)
जें मायाजाळीं पडलें .
ते ईश्वरासी चुकलें .
ते प्राणी सांपडलें .
वासनाबंधनी ........................(५-१७)
जयाचें दैव उदेलें .
तयास ज्ञान प्राप्त जालें .
तयाचें बन्धन तुटलें .
नि:संगपणें ..........................(५-१८)
सर्वसाक्षी तुर्या अवस्था .
तयेचाहि तूं जाणता .
म्हणोनी तुज नि:संगता .
सहजचि आली .....................(५-१९)
आपणासी तूं जाणसी .
तरी तूं ही नव्हेसी .
तूंपणाची कायेसी .
मात स्वरूपीं ........................(५-२०)
जाणता आणि वस्तु
दोनीं निमाल्यां उर्वरीतु .
तूंपणाची मातु .
सहजचि वाव .....................(५-२१)
आतां असो शब्दपाल्हाळ .
तुझें तुटलें जन्ममूळ .
कां जें नाशिवंत सकळ .
मदार्पण केलें .....................(५-२२)
जें जें जाणोनि टाकिलें .
तें तें नाशिवंत, राहिलें .
तुझें तुज प्राप्त जालें .
अक्षई पद .........................(५-२३)
ऐसें बोलें मोक्षपाणी .
ऐकोन शिष्य लोटांगणीं .
नि:संदेह स्वरूपमिळणीं .
दोघे येकचि जाले ................(५-२४)
ऐसा कृपाळू स्वामीराव .
आदिपुरुष देवाधिदेव .
शिष्यास निजपदीं ठाव .
ऐक्यरूपें दिधला ..................(५-२५)
जो शिष्य स्वामीस शरण गेला .
आणि संदेहावेगळा जाला .
तेणें जन्म सार्थक केला .
जो देवासी दुल्लभु ...............(५-२६)
ग्रंथ संपतां स्तुतिउत्तरें .
बोलताती अपारें .
परी अर्थासी कारण, येरें .
येरा चाड नाहीं ....................(५-२७)
इति श्री आत्माराम .
रामदासीं पूर्णकाम .
नि:संदेह जालें अंतर्याम .
सद्गुरुचरणीं .........................(५-२८)
II श्रीसद्गुरुनाथार्पणमस्तु II
II तथास्तु - तथास्तु - तथास्तु II
II समास पाचवा संपूर्ण II
II जय जय रघुवीर समर्थ II
_____________________________________
------------------------------ॐ------------------------
_____________________________________
Next Post - "Amrutanubhava-अमृतानुभव "
______________________________________
***************************************